मविआच्या दोन मतांवर भाजपचा आक्षेप, मात्र मतदान ग्राह्य

मविआच्या दोन मतांवर भाजपचा आक्षेप, मात्र मतदान ग्राह्य

| Updated on: Jun 10, 2022 | 1:31 PM

आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली. यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका आपल्या एजंटला दाखवली. त्यामुळे ही तिन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार सुहास कांदे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली. यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका आपल्या एजंटला दाखवली. त्यामुळे ही तिन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली आहे. हे मत बाद होत नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्याने सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करू, असा इशारा भाजपने दिला आहे. तर, आम्हाला मतदान कसं करायचं हे आम्हाला कळतं. तुम्हालाच कळतं असं नाही. भाजपचे नेते बावचळलेले आहेत, अशी टीका करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.