उंटावर हंडे, आघाडी तिघाडी बिघाडीचे पोस्टर्स, भाजपचं अनोखं आंदोलन !
बुड बुड घागरी म्हणत भाजप कडून आंदोलन केलं जातंय आणि हे आंदोलन पाणी प्रश्नासाठी नसून केवळ राजकारणासाठी असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. पाच वर्षे भाजपनं काय केलं असा प्रश्न शिवसेना विचारतेय.
औरंगाबाद : भाजपचा जल आक्रोश ! कुणी उंटावर हंडे लाऊन, कुणी हातात घेऊन, कुणी रिक्षावर हंडे लावलेत, असे देखावे तयार करत लोकं जल आक्रोश मोर्चात सहभागी झालेत. ” महाविकास आघाडी तिघाडी आणि पाणी प्रश्न बिघाडी” अशा प्रकारचे पोस्टर्स (Posters) लावले गेलेत. बुड बुड घागरी म्हणत भाजप (BJP) कडून आंदोलन केलं जातंय आणि हे आंदोलन पाणी प्रश्नासाठी नसून केवळ राजकारणासाठी (Politics) असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. पाच वर्षे भाजपनं काय केलं असा प्रश्न शिवसेना विचारतेय.
Latest Videos