Suresh Kakani | मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट, योग्य ती काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन
कोरोनाची दुसरी लाट हद्दपार करण्यात पालिकेला यश आले असतानाच आता मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट ओढावले आहे.
कोरोनाची दुसरी लाट हद्दपार करण्यात पालिकेला यश आले असतानाच आता मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट ओढावले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट गडद होताना दिसत आहे.
दरम्यान, पावसाळी आजारांमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, ‘एच1एन1’चे 44 रुग्ण आढळले होते.
Latest Videos