BMC Election | मुंबई महापालिकेचं जागांचं गणित नेमकं कसंय?

BMC Election | मुंबई महापालिकेचं जागांचं गणित नेमकं कसंय?

| Updated on: May 22, 2023 | 9:54 AM

VIDEO | भाजप आणि ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेच्या जागांवर दावे-प्रतिदावे सुरू, मात्र जागा नेमक्या कशा असतात?

मुंबई : मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक निवडून जातात. त्यासाठी बहुमत ११४ जागांची गरज असते. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेना ९७, भाजप ८३, काँग्रेस २९, राष्ट्रवादी ८, सपा ६, मनसे १ आणि इतर ३ असे बलाबल पाहायला मिळाले होते. मुंबई महापालिकेत सताधाऱ्यांचा कार्यकाळ हा गेल्या वर्षी ७ मार्चमध्ये संपलाय, तर निवडणुका लांबणीवर म्हणून ही सूत्र आता प्रशासकाकडे आहे. ३८ वर्षानंतर पहिल्यांदा मुंबईचा कारभार एका प्रशासकाच्या हाती आहे. याआधी एप्रिल १९८४ ते १९८५ दरम्यान मुंबई महापालिकेत प्रशासकाच्या ताब्यात होती. २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. सत्तेत एकत्र मात्र महापालिकेत विरोधक असा प्रचार रंगला होता. भाजपकडे शिवसेना आणि रामदास आठवले यांचा रिपाई गट आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केलीये. त्यात जर ठाकरेंना काँग्रेसची साथ मिळाली तर ही मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होणार आहे.

Published on: May 22, 2023 09:54 AM