सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली
देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दहशत माजवली आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसात राज्यात 46 हजार 406 रुग्ण (Corona) आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दहशत माजवली आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसात राज्यात 46 हजार 406 रुग्ण (Corona) आढळून आहेत, तर कोरोनामुळे 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला आकडा काहीसा घसल्याने मुंबईला थोडा दिलासा मिळताना दिसून येत आहे. मात्र तरिही मुंबईतील रुग्णवाढ ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. कोरोनाच्या स्फोटक वाढीने मुंबईला लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते, त्यामुळे मुंबई महापालिका (Bmc) प्रशासन अलर्ट मोडवर येत, काही कठोर निर्णय घेत आहे. अनेकजण सध्या सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत, मात्र याबाबत पालिकेला माहिती देणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
Latest Videos