नवनीत राणांच्या मुंबईतील इमारतीमधील सर्व मालकांना BMCची नोटीस

नवनीत राणांच्या मुंबईतील इमारतीमधील सर्व मालकांना BMCची नोटीस

| Updated on: May 27, 2022 | 2:59 PM

नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आला होता. मुंबईतील खार परिसरातील इमारतीत राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे.

नवनीत राणा (Navneet rana) यांच्या मुंबईतील फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे. इमारतीतील सर्वच फ्लॅटधारकांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस पाठवली आहे. नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आला होता. मुंबईतील खार परिसरातील इमारतीत राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. राणा दाम्पत्याच्या फ्लॅटला बीएमसीने याआधी नोटीस पाठवली होती. आता खारमधील या इमारतीत राहणाऱ्या सर्वच फ्लॅटधारकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे नुकतेच दिल्लीतून अमरावतीत दाखल झाले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याविरोधात पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

Published on: May 27, 2022 02:59 PM