...तर मालाड सबवेजवळ पाणी तुंबणार नाही, पंपिंग मशीन ऑपरेटर काय म्हणाले?

…तर मालाड सबवेजवळ पाणी तुंबणार नाही, पंपिंग मशीन ऑपरेटर काय म्हणाले?

| Updated on: Jun 14, 2023 | 10:33 AM

VIDEO | मान्सूनच्या आगमनापूर्वी मुंबई उपनगर सज्ज; मालाड, अंधेरी आणि मिलन सबवे जवळ बीएमसीकडून पंपिंग मशीन

मुंबई : मुंबई उपनगरातील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेने मान्सूनच्या आगमनापूर्वी तयारी केली आहे. मुंबई उपनगरातील मालाड, अंधेरी आणि मिलन सबवे जवळ बीएमसीने पंपिंग मशीन बसवल्या आहेत. पाऊस सुरू होताच हे पंपिंग मशिन सुरू केले जाते आणि भुयारी मार्गात साचलेले पाणी हे मशिन बाहेर काढते. या प्रकारचे पंपिंग मशिन भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला बसवलेले आहे, जे पाणी लवकर बाहेर काढण्याचे काम करते. दरवर्षी इथे पंपिंग मशिन बसवले जाते आणि त्यानंतरही या भुयारी मार्गांमध्ये पाणी भरते आणि आणि लोकांच्या अडचणी वाढतात. आता या वेळी भुयारी मार्गातून पाणी काढण्यात पालिकेने बसवलेले हे पंपिंग मशिन कितपत यशस्वी ठरते हे पाहावे लागेल. दरम्यान, मालाड सबवेजवळ पंपिंग मशिन चालवणारे राजेश कुमार यांनी सांगितले की, मालाड सबवेजवळ सुमारे 10 ते 12 पंपिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. येथे दरवर्षी पाणी भरते, कितीही पंपिंग मशिन बसवले, तरीही भुयारी मार्गात पाणी भरेल. राजेश कुमार म्हणाले की, येथे पंपिंग मशिन बसवण्याऐवजी रस्ता उंचावला किंवा उड्डाणपूल केला तर पाणी तुंबण्याची समस्या संपेल, यावर्षीही जोरदार पाऊस झाला तर पाणी तुंबेल.

Published on: Jun 14, 2023 10:33 AM