Mohit Kamboj यांच्या Khushi Paradise इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचा पालिकेला संशय

Mohit Kamboj यांच्या Khushi Paradise इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचा पालिकेला संशय

| Updated on: Mar 22, 2022 | 10:18 AM

मुंबई महापालिकेकडून (BMC) अनधिकृत बांधकामांसर्भात करण्यात येणाऱ्या कारवाया सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली तोडक कारवाई चांगलीच गाजली होती.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC) अनधिकृत बांधकामांसर्भात करण्यात येणाऱ्या कारवाया सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली तोडक कारवाई चांगलीच गाजली होती. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यासंदर्भात बीएमसीकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना आतापर्यंत तीन नोटीस पाठवल्या असून 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांनी बीएमसीच्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेनं आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना देखील एक नोटीस पाठवली आहे. बीएमसीनं कलम 488 नुसार ही नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात कंबोज यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिलेली आहे.

मोहित कंबोज यांच्या इमारतीत अतिरिक्त बांधकामाचा बीएमसीला संशय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेनी आता भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला शंका आहे.23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.