मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागात पाणी पुरवठा आज राहणार बंद

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात पाणी पुरवठा आज राहणार बंद

| Updated on: Feb 08, 2023 | 9:28 AM

मुंबईतील कोणत्या भागात राहणार पाणी पुरवठा बंद? मुंबई पालिकेने कोणत्या दिल्या मुंबईकरांना सूचना?

मुंबई : मुंबईमधील काही भागात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाकडून ट्रॉम्बे येथील जलाशयामधील जलवाहिन्यांचं काम हाती घेतल्यामुळे पालिकेच्या विभागांमध्ये आज एम पश्चिम आणि एम पूर्व या महापालिकेच्या विभागामध्ये आज पाणीपुरवठा हा खंडित राहणार आहे. आज सकाळी दहा ते उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द या संपूर्ण परिसरामधील राहणाऱ्या नागरिकांना पाणी जपून वापरा अशी महत्वाची सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे. चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द या संपूर्ण परिसरात २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने मुंबईकरांनो पाणी जपून वापरा…

Published on: Feb 08, 2023 09:28 AM