काम करत नसल्याने मंडळ अधिकाऱ्याला कार्यालयातच मारहाण – Aurangabad

| Updated on: Mar 16, 2022 | 6:33 PM

पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेवरून अशा प्रकारे राग व्यक्त करण्यात आला आहे. मात्र लोकशाही मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी दाद मागण्याची कायद्यानुसार, सुविधा असताना हे प्रकरण मारहाणीपर्यंत, एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जातंय, हे समाजासाठी जास्त धोकादायक आहे.

औरंगाबादः औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून मारहाणाच्या (Aurangabad fighting) घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. कालच करंजखेडा बाजारसमितीत दोन व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्यालाच मारहाण (Pachod officer beaten) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मंडळ अधिकारी काम करत नसल्यामुळे ही मारहाण झाल्याचं कारण समोर आलं आहे. काल समोर आलेल्या घटनेत, करंजखेडा (Karanjkheda trader beaten) येथील घटनेत शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव दिला म्हणून संबंधित व्यापाऱ्यावर संताप काढण्यात आला होता तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेवरून अशा प्रकारे राग व्यक्त करण्यात आला आहे. मात्र लोकशाही मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी दाद मागण्याची कायद्यानुसार, सुविधा असताना हे प्रकरण मारहाणीपर्यंत, एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जातंय, हे समाजासाठी जास्त धोकादायक आहे. तसेच थेट कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत, याचाच दुसरा अर्थ म्हणजे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवरही अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.