बॉलिवूड कलाकारांची राजकारणात एन्ट्री, शिंदे गटाकडून ‘हे’ स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
शिवसेनेकडून नुकतंच स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 40 स्टार प्रचारक नेत्यांची नावे होती. यानंतर आता बॉलिवूडमधील कलाकारांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांची देखील स्टार प्रचारक म्हणून घोषणा होणार का?
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकाजवळ आल्याअसून प्रत्येक पक्षात काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्याचं बदलतं राजकारण पाहता अभिनेत्री-अभिनेते राजकारणाकडे वळताना दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर, करिष्मा कपूर आणि अभिनेता गोविंदा अहुजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान कपूर बहिणींनी याआधी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलीय. शिवसेनेकडून नुकतंच स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 40 स्टार प्रचारक नेत्यांची नावे होती. यानंतर आता बॉलिवूडमधील कलाकारांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांची देखील स्टार प्रचारक म्हणून घोषणा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे गोविंदाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते? अशी देखील चर्चा आहे. याबाबत आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.