Mehmood Junior : ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज

Mehmood Junior : ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, ‘या’ आजाराशी देत होते झुंज

| Updated on: Dec 08, 2023 | 10:42 AM

अभिनेता गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर होते आणि या गंभीर आजाराशी ते झुंज देत होते. अखेर त्यांची या आजाराशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. त्यामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी गुरूवारी मध्यरात्री या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

Actor Junior Mehmood Passes Away : हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशके आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता ज्युनियर महमूद यांचं निधन झालं आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर होते आणि या गंभीर आजाराशी ते झुंज देत होते. अखेर त्यांची या आजाराशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. त्यामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी गुरूवारी मध्यरात्री या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. इतकंच नाहीतर त्यांना रुग्णालयातून घरी आणल्यानंतर घरीही त्यांच्यावर उपचार सुरू होते. या अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूदच्या निधनाची बातमी त्यांच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे. आज दुपारी सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Published on: Dec 08, 2023 10:42 AM