Saif Ali Khan Accused Photo : सैफवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या या आरोपीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू करण्यात आला होता.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तीचा अखेर फोटो समोर आला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर दोन जखमा झाल्या होत्या. यासह सैफच्या मणक्याला जबर दुखापतही झाली होती. दरम्यान, यानंतर त्याला लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची तब्येत सध्या स्थिर असून तो आयसीयूमध्ये आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या या आरोपीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू करण्यात आला होता. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांच्या या तपासादरम्यान, आरोपीचा एक फोटो समोर आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेजमधील आरोपीचा फोटो शेअर केला आहे. आरोपीवर 311, 312, 331 (4), 331 (6), 331 (7) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.