सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका, 'या' नावाजलेल्या अभिनेत्रीच्या ईमेलवर धमकीचा मेल

सलमान खानच्या जीवाला पुन्हा धोका, ‘या’ नावाजलेल्या अभिनेत्रीच्या ईमेलवर धमकीचा मेल

| Updated on: Apr 19, 2023 | 8:49 AM

VIDEO | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका, आता कुणी दिली धमकी

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि राखी सावंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही धमकी दिली आहे. ही धमकी त्यांना ईमेलवर पाठवण्यात आली असून हा मेल बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला पाठवण्यात आला आहे. या मेलमध्ये आम्ही सलमान खानला मुंबईत जीवे मारून टाकू, असे म्हटले आहे. तर तू (राखी सावंत) यामध्ये अडकू नकोस, अन्यथा तू अडचणीत येईल, असेही राखीला धमकावल्याचे दिसतेय. दरम्यान, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सलमानला अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र सलमानशी संबंधित या धमकीमध्ये राखी सावंतलाही पहिल्यांदाच धमकी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहेत.

Published on: Apr 19, 2023 08:41 AM