सलमान खान धमकी प्रकरणी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांनी घेतलं एकाला ताब्यात; कोण आहे ‘तो’?
VIDEO | बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, लॉरेन्स बिश्नोई सोबत 'त्याचे' कनेक्शन?
मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिल्यानंतर एक ईमेलही पाठवण्यात आला. या ईमेलमध्ये सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे म्हटले होते. या धमकी प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खान याला जीवे मारण्याचा ईमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी थेट राजस्थानमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे याचे थेट लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत कनेक्शन असल्याची चर्चा सुरू आहे.
Published on: Mar 26, 2023 07:34 PM
Latest Videos