Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कंगना रनौत म्हणाली, अद्भूत….
. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचेही काही फोटो व्हिडीओ समोर येत आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर कंगना रनौत हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पूर्ण झाला. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचेही काही फोटो व्हिडीओ समोर येत आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर कंगना रनौत हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अयोध्येतील वातावरण बघून असं वाटतंय जसं की एखाद्या पौराणिक कालखंडात पोहोचले आहे. त्या पौराणिक कथांमध्ये आपण ऐकायचो की, भव्य महाल, मोठाले होम-हवन, गंधर्व असायचे. असाच अद्भूत आणि अलौकिक अनुभव अयोध्येत आज बघायला मिळत आहे.’, असे कंगना रनौत म्हणाली. तर अयोध्येतील विकास आणि अयोध्येच्या या राम मंदिरावर बोलताना कंगनानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केले आहे. तर कंगना एक दिवस आधीच अयोध्येत पोहोचली होती आणि रामच्या नगरीत रामभद्राचार्यांची भेट घेतली होती. हनुमान मंदिरात हवन करून मंदिराची स्वच्छता केली. आज कंगनाने आज पारंपारिक वेशभूषा करून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजेरी लावली होती.