Sunny Leone : बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात ‘इतके’ रूपये… भानगड नेमकी काय?
छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनीचं नाव वापरत सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्याने एकच चर्चेला उधाण आलं आहे.
बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमी बोल्ड लूक आणि तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. मात्र ही बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे. आता चर्चेत असण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. सनी लिओनी एका सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. हे ऐकून तुम्हीदेखील हैराण झाला असाल… छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या कुटुंबातील तीन महिलाच नव्हे तर अभिनेत्री सनी लिओनी ही देखील महतारी वंदन योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनीचं नाव वापरत सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्याने एकच चर्चेला उधाण आलं आहे. महतारी वंदन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहीत महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्यात येतात. 2024 मध्ये सत्ताधारी भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान ही घोषणा केली होती. याच योजनेअंतर्गतचे सनी लिओनी हिच्या नावाने ऑनलाईन अकाऊंट उघडण्यात आलं आणि पैसे सनी लिओनीच्या नावावरील अकाऊंटमध्ये पैसे पाठवले जात आहे.