Special Report | बॉलिवूडची बेताल Queen कंगना रनौतची चौफेर कोंडी
कंगनाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते.
मुंबई : बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. कंगनाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कंगना रनौत सध्या चर्चेत आहे.
Latest Videos