WITT Global Summit : कॉन्ट्रोव्हर्सीला कसं तोंड देतो ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खान?
TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या विशेष कार्यक्रमात बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच सहभागी झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची घटस्फोटित पत्नी किरण रावही दिसली. यावेळी दोघेही त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटाबद्दल भाष्य केलं.
नवी दिल्ली २७ फेब्रुवारी, २०२४ : TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या विशेष कार्यक्रमात बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच सहभागी झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची घटस्फोटित पत्नी किरण रावही दिसली. यावेळी दोघेही त्यांच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाबद्दल भाष्य केलं. याशिवाय आमिर खानने राजकारण आणि कॉन्ट्रोव्हर्सी वरही आपली मत मांडली. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत असून चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले आहे. चित्रपटाव्यतिरिक्त आमिर खानने राजकीय विषयांवरही चर्चा केली. सत्ता सम्मेलनादरम्यान आमिर खानला विचारण्यात आले की, तो आजच्या काळात वाद आणि कॉन्ट्रोव्हर्सीशी कसा सामना करतो? कित्येकदा अभिनेत्यावरच आरोप केले जातात तर काही प्रकरणांमध्ये जाणून-बुजून ओढले जाते. या सगळ्याला तो कसा सामोरा जातो? यावर आमिरने हसत हसत उत्तर दिले. तो म्हणाला मी गप्प राहून हे सर्व हाताळतो. जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला तर मी या प्रश्नावर मौन बाळगले पाहिजे. कारण माझा चित्रपट आता येत आहे. आणि मी या सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आजकाल कॉन्ट्रोव्हर्सीशिवाय जीवन जगणे हे फार कठीण झाले आहे. त्यामुळे मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे.