सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

| Updated on: Dec 01, 2021 | 1:29 PM

मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे. 2018 मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी (Koregaon Bhima Case) सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती.

मुंबई: मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे. 2018 मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी (Koregaon Bhima Case) सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, इतर आठ जणांचे जामिनाचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर, मुंबई हायकोर्टानं सुधीर ढवळे, वरवरा राव, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, वेर्नन गोन्सालवीस, अरुन फरेरिरया यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहेत.

Published on: Dec 01, 2021 01:29 PM