मराठ्यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची याचिका, हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?
मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलनामुळे लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी द्या, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना निर्देश दिलेत. आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलनामुळे लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी द्या, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना निर्देश दिलेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असेही मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, रास्तारोको आंदोलन करता येणार नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका मांडली. राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असेल तर आम्ही कारवाई करू, असे महाधिवक्त्याने म्हटले आहे.