Special Report | क्रूझ पार्टी प्रकरणात दोघांना जामीन, आर्यन खान ‘वेटिंग’वर !

| Updated on: Oct 26, 2021 | 8:54 PM

आर्यन खान याच्या जामिनावर आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. आज फक्त युक्तिवाद झाले. आज एका बाजून युक्तिवाद झाला आहे. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.

मुंबई : एनसीबीने केस मोठी करण्यासाठीच अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं होतं, असा धक्कादायक दावा अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी केला आहे. अचितकुमार हा चांगला मुलगा असून आपण त्याला आधीपासून ओळखत आहोत, असा दावाही तारक सय्यद यांनी केला आहे. आर्यन खान याच्या जामिनावर आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. आज फक्त युक्तिवाद झाले. आज एका बाजून युक्तिवाद झाला आहे. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. युक्तिवाद सुरू असल्याने न्यायाधीशांनी आज काही सांगितलं नाही. उद्या 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, असं वकिलांनी सांगितलं. अरबाज मर्चंट आणि आर्यन खान मित्रं असल्याचंही कोर्टाला सांगितल्याचं वकिलांनी सांगितलं. शुक्रवारपर्यंत निकाल येईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो असेल तो निर्णय येईल, असंही त्यांनी सांगितलं.