संभाजीनगरची निवडणूक 2019 हून यंदा चुरशीची ठरणार? शिवसेनेच्या दोन्ही गटानं काय केला दावा?
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आम्हीच जिंकू असा दावा शिवसेनेच्या दोन्ही गटाने केला. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. संभाजीनगरची निवडणूक 2019 हून चुरशीची ठरणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आम्हीच जिंकू असा दावा शिवसेनेच्या दोन्ही गटाने केला. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मतं तर अपक्ष म्हणून लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८ मतं मिळाली. काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना ९१ हजार ७८९ मतं पडली. त्यावेळी ४ हजार ४९२ मतांनी इम्तियाज जलील यांचा विजय झाला. विभागानुसार कोणाला किती मतदान होतंय हे पाहिल्यास संभाजीनगर लोकसभा मतदार संघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. दरम्यान, चंद्रकांत खैरे हे कन्नड, संभाजीनगर पश्चिम आणि वैजापूरमध्ये लीड होते. इम्तियाज जलील हे संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पूर्व तर हर्षवर्धन जाधव हे गंगापूरमधून लीडवर होते. मात्र संभाजीनगरची निवडणूक 2019 हून यंदा चुरशीची ठरणार का? पाहा स्पेशल रिपोर्ट