दोन्ही ठाकरे बंधू अॅक्शन मोडमध्ये! उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांची कशी सुरूये तयारी? बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू अॅक्शन मोडमध्ये... 'सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा', मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणाले... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू अॅक्शन मोडमध्ये आलेत. राज ठाकरे हे तीन दिवसांपासून दौऱ्यावर आहेत. तर मनसैनिकांकडून आंदोलनं देखील सुरू झालीत. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभेच्या ४८ जागांचा आढावा घेणं सुरूये. खड्ड्यांवरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आंदोलनाचे आदेश दिलेत. रोज कुठेना कुठे टोल नाके फोडणं सुरू झालेत. मनसैनिकांनी राजापूर, रत्नागिरी, पाली, माणगाव, पनवेल आणि ठाणे या ठिकाणी तोडफोड केली. खड्ड्यांचा विषय लावून धरत राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना पुन्हा अॅक्टीव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. तसं पाहिला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू अॅक्शन मोडमध्ये आलेत. बुधवारी राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी खड्ड्यावरून आंदोलन करण्याचे आदेश दिलेत. गुरूवारी ते ठाण्यात होते तर यावेळी पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. ठाण्यानंतर राज ठाकरे लगेच पुण्यात आलेत. यावेळी हडपसर येथील काळेपडळ येथील शाखेचं उद्धाटन केले. शनिवारी राज ठाकरे पिंपरी चिंचवड येथे दौऱ्यावर असणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर लोकसभेच्या ४८ जागांचा आढावा घेणं सुरू केलंय. बघा कशी सुरूये लोकसभेची तयारी…