Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phule Movie : फुले चित्रपटातील ‘त्या’ सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवे यांची मागणी काय?

Phule Movie : फुले चित्रपटातील ‘त्या’ सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवे यांची मागणी काय?

| Updated on: Apr 08, 2025 | 6:48 PM

आशिष शेलार यांनीही आक्षेपावर सेन्सॉर बोर्ड योग्य काम करेल असे म्हटले आहे. सिनेमा बनवणारे निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल. सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देतील.

फुले चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध दर्शविला जातोय. फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. ११ एप्रिलला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा टीझर प्रकाशित झाला आहे. यातील एका दृश्यात एका ब्राह्मण मुलाला दगड मारताना दाखवण्यात आला आहे. यावरच आनंद दवेंनी आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण समाजाच्या फक्त निगेटिव्हच नको तर पॉझिटिव्ह गोष्टीही चित्रपटात दाखवा अशी मागणी आनंद दवेंनी केली आहे. चित्रपटामुळे जातीयवाद वाढू नये अशी अपेक्षाही दवेंनी व्यक्त केली आहे. फुले हा चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक असावा, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे. त्या काळी ब्राह्मण समाजान केलेली मदत ही चित्रपटात दाखवा तर चित्रपटामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो अशी शक्यता आनंद दवेंनी व्यक्त केली. आक्षेपानंतर फुले सिनेमाचे वितरक उमेश बन्सल यांनी आनंद दवेंना फोन केला आहे. दवेंना काही दृश्यांवर आक्षेप असेल तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू, असं आश्वासन दवेंना देण्यात आलं.

Published on: Apr 08, 2025 06:48 PM