ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा ब्रेकफास्ट
शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले.
शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले. काहींनी उठल्यावर योगा केला, तर काहींनी व्यायाम केला. तर काहींनी ध्यानधारणा केली. त्यानंतर सर्व आमदार तयार होऊन नाश्याताला एकत्र आले. कुणी मसाला डोसा, कुणी ऑमलेट तर कुणी इडली, डोश्यावर ताव मारला. त्यानंतर काही आमदारांनी मीडियाशी संवादही साधला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 11.30 वाजेपर्यंत 187 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.
Published on: Jun 10, 2022 01:22 PM
Latest Videos