Breaking | पायी वारी काढू नका, बंडातात्या कराडकरांना पोलिसांकडून समज

Breaking | पायी वारी काढू नका, बंडातात्या कराडकरांना पोलिसांकडून समज

| Updated on: Jun 29, 2021 | 10:37 PM

वारकरी आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत येणारच असेही कराडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या याच आवाहनानंतर आता फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसरी कोरोना लाट लक्षात घेता यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील वारकऱ्यांना येत्या 3 जुलै रोजी आळंदी येथे मोठ्या संख्येने अपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने कोणतीही कारवाई केली तरी चालेल. पण वारकरी आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत येणारच असेही कराडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या याच आवाहनानंतर आता फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.