Breaking | पाकिस्तान-न्यूझीलंड वन डे सीरिज रद्द

| Updated on: Sep 17, 2021 | 4:30 PM

पाकिस्तान-न्यूझीलंडल वनडे सीरिज रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रावळपिंडी वन डे सुरु होण्याआधीच मॅच रद्द करण्यात आली आहे. पहिल्या सामन्याचा टॉस होण्याच्या अर्धा तास आधीच मॅच रद्द करण्यात आली. 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज रद्द झाली आहे. न्यूझीलंड संघ आता परत मायदेशी जाणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड टीम तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. संपूर्ण संघ 12 सप्टेंबरला पाकिस्तानात पोहोचला होता. सर्व संघाला कडक पोलीस बंदोबस्तात इस्लामापूर विमानतळावरुन हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. पीसीबीने न्यूझीलंड आणि त्यांच्या खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये बायो बबलची व्यवस्था केली होती.