चिपळूणमध्ये पूल पडला, उद्योगमंत्री म्हणाले, ‘गडकरी यांना बदनाम…’
शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली त्यातील काही नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात आहेत. ज्यांना कार्यकारीणीतून बाजूला करण्यात आले त्यातीलही काही आमच्या संपर्कात आहेत. काही महिला पदाधिकारी देखील संपर्कात आहेत असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
रत्नागिरी | 18 ऑक्टोंबर 2023 : चिपळूणमधील बहादूर शेख येथील उड्डाणपूल कोसळल्याची घटना काल घडली. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. तांत्रिक अडचणीमुळे हा ब्रिज पडला अशी प्राथमिक माहिती समोर आली असे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी 3 जणांची समिती नेमण्यात आली आहे. नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली याची शहानिशा ही समिती करेल. अहवालातून कोणाची चूक होती हे समोर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 10 तारखेपर्यंत सर्व्हिस रोड पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत. तुटलेल्या पुलासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्याशी चर्चा झाली आहे. पण, मुंबई गोवा महामार्ग हा हायवे गडकरी साहेबांना बदनाम करणारा ठरलेला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
Published on: Oct 18, 2023 07:02 PM
Latest Videos