Brigadier LS Lidder | माझे वडील माझ्यासाठी अभिमान, तेच माझे खरे हिरो!
ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने बेरार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर साश्रू नयनांनी आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना दिसल्या.
ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने बेरार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर साश्रू नयनांनी आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना दिसल्या. त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून दु:खाचा प्रवाह वाहत होता. ब्रिगेडियर एलएस लिद्दर हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. त्यांची मुलगी आशना लिद्दर हिनेही साश्रू नयनांनी वडिलांचा शेवटचा निरोप घेतला.
वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर लिद्दर यांची मुलगी आशना लिद्दर म्हणाली की, ‘मी आता 17 वर्षांची होणार आहे. माझे वडील 17 वर्षे माझ्यासोबत राहिले. त्याच्या चांगल्या आठवणी आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राष्ट्राचे नुकसान झाले आहे. माझे वडील माझे चांगले मित्र आणि माझे हिरो होते. ते खूप आनंदी व्यक्ती होता आणि माझ्यासाठी माझी प्रेरणा होते.’