Brigadier LS Lidder | त्यांना चांगला निरोप द्यायचाय, शेवटी मी सैनिकाची पत्नी आहे!
ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर म्हणाल्या की, 'आपण त्यांना हसतमुखानेच निरोप द्यायला हवा. मुलगी त्यांना खूप मिस करेल. हे खूप मोठे नुकसान आहे.’
कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांमध्ये ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांचा समावेश होता, ज्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सहाय्यक म्हणून काम केले होते. आज दिल्लीतील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने बेरार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर साश्रू नयनांनी आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना दिसल्या. त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून दु:खाचा प्रवाह वाहत होता. ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर म्हणाल्या की, ‘आपण त्यांना हसतमुखानेच निरोप द्यायला हवा. मुलगी त्यांना खूप मिस करेल. हे खूप मोठे नुकसान आहे.’