राज ठाकरे यांच्या सोबतचा वाद जुना झाला; बृजभूषण सिंह बॅकफूटवर?
अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विरोध करणारे बृजभूषण सिंग पुण्यात राज ठाकरेंबाबत काय बोलणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष असतांना त्यांनी राज ठाकरेंवर भाष्य केले. 10 महिन्यानंतर बृजभूषण सिंग म्हणतात, राज ठाकरेंसोबतचा वाद जुना आहे. त्यामुळे 10 महिन्यानंतर बृजभूषण सिंह यांना उपरती झाली का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे अयोजन संस्कृती प्रतिष्ठान आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भाजप खासदार बृजभूषण सिंग पुण्यात आले.
दरम्यान, अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विरोध करणारे बृजभूषण सिंग पुण्यात राज ठाकरेंबाबत काय बोलणार का याकडे लक्ष लागलेलं असतांना त्यांनी राज ठाकरेंवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंसोबत असणारा वाद जुना झाला असे बृजभूषण सिंग म्हणाले. त्यामुळे 10 महिन्यानंतर त्यांना उपरती झाली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बृजभूषण सिंग हे भाजपचे खासदार असून भारतीय कुस्ती संघाचे ते अध्यक्ष स्थानी आहेत. त्यामुळे बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघण्यासाठी आले होते. दरम्यान, पुण्यात एन्ट्री होताच बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंवर भाष्य केले.