brijbhushan singh, : बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंविरोधात रॅली, अयोध्या दौऱ्याला विरोध कायम
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. यानंतर राज ठाकरेंनी सभा स्थगित केली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan singh) यांनी विरोध केला आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. उत्तर प्रदेशसह देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि विशेषत: राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलं होतं. अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून काही ट्रेन देखील बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, ही तयारी सुरू असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. यानंतर राज ठाकरेंनी सभा स्थगित केली. यावर आज राज ठाकरेंनी उत्तर दिलंय. दरम्यान, यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात रॅली काढली.
Published on: May 22, 2022 01:25 PM
Latest Videos