Nagpure | नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये खाजगी पेथॉलॉजी लॅबच्या दलालांचा बोलबाला
हे मेडिकल कॉलेज गरिबांसाठी जीवनदायी ठरते. या ठिकाणी अत्यावश्यकसर्व चाचण्या सुद्धा होतात. मात्र काही खाजगी पेथॉलॉजी लॅबोरटीने आपले दलाल पोसले असून हे दलाल या ठिकाणी घुसखोरी करत रुग्णांना बाहेर तपासण्या करण्यास प्रवृत्त करतात.
नागपूर : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये खाजगी पेथॉलॉजीच्या दलालांचा बोलबाला सुरु आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना भूलथापा देत बाहेरून चाचण्या करण्यास परावृत्त करत असल्याचं उघडकीस आलं आहे. मेडिकल प्रशासनाने आतापर्यंत 8 ते 10 दलालांना पोलिसांच्या हवाली केलं आहे. मात्र यामुळे सामान्य रुग्णांची लूट होत आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर सामान्य जनतेसाठी होतो. मात्र अशा प्रकारचे दलाल सामान्य माणसाची लूट करण्यासाठी असे काम करतात यावर कठोर कारवाईची गरज आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे नागपूर आणि विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगडला आरोग्य सेवा देणारे केंद्र. या ठिकाणी लहानात लहानापासून ते मोठ्या आजारापर्यंत उपचार केले जातात. हे मेडिकल कॉलेज गरिबांसाठी जीवनदायी ठरते. या ठिकाणी अत्यावश्यकसर्व चाचण्या सुद्धा होतात. मात्र काही खाजगी पेथॉलॉजी लॅबोरटीने आपले दलाल पोसले असून हे दलाल या ठिकाणी घुसखोरी करत रुग्णांना बाहेर तपासण्या करण्यास प्रवृत्त करतात.