सेवानिवृत्ताला अवघे 7 महिने बाकी, मात्र काळाचा घाला अन् BSF जवान शहीद

सेवानिवृत्ताला अवघे 7 महिने बाकी, मात्र काळाचा घाला अन् BSF जवान शहीद

| Updated on: Mar 16, 2023 | 11:15 PM

VIDEO | चाळीस गावचे जवान प्रदीप नाना पाटील यांना BSF मध्ये कर्तव्य बजावताना वीर मरण, सेवानिवृत्तीला बाकी होते केवळ सात महिने

चाळीसगाव : चाळीसगाव जिल्ह्यातील कोदगाव येथील प्रदीप नाना पाटील हे भूमिपुत्र. त्यांचे वडील नाना आप्पा हे बागायतदार शेतकरी. त्यांना तीन मुले. घरी सधन कुटुंब आहे. प्रदीप पाटील हे २००३ साली बीएसएफमध्ये भरती झाले. प्रदीप मनमिळाऊ आणि संयमी होते. सीमेवरून सुटीमध्ये घरी जायचे तेव्हा गावातील लोकं त्यांना भेटायला येत. अवघे सात महिने सेवानिवृत्तीला बाकी असताना दुःखत घटना घडली. परेड सुरू असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. प्रदीप यांना दवाखान्यात हलवण्यात आले. दोन-तीन दिवस प्रकृती बरी नव्हती. १३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता प्रदीप यांनी अखेरचा श्वास घेतला अन् चाळीसगावात एकच हळहळ व्यक्त होतेय. सात महिन्यांनंतर आपण घरी जाऊ, असे प्रदीप यांना वाटत होतं. घरचे लोकंही ते लवकरच सोबत राहायला येणार म्हणून खुश होते. पण, नियतीने घात केला. अचानक प्रकृती खराब होऊत कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. सेवानिवृत्ती जवळ येत असताना त्यांनी ड्युटी वाढवून घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातला आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Published on: Mar 16, 2023 11:15 PM