आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार, सामान्यांसाठी काय? यासह जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असून यामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का?
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असून यामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर अनिल परब यांचं घर हे तर फक्त झाँकी, मातोश्री २ अभी बाकी, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना नितेश राणे यांची जीभ घरसली. तर नितेश राणे यांनी अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुक्या धमक्या देऊ नका, आमच्या घरात धिंगाणा घालणं इतकं सोपं नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. ऑफिस तोडण्यावरून अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष पेटला आहे. अनिल परब यांचा म्हाडाच्या ऑफिसमध्ये चार तास ठिय्या आंदोलन, तर म्हाडा ऑफिस बाहेर शिवसैनिकांचा मोठा राडा देखील पाहायला मिळाला आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…