Budget 2024 | 3 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवणार, महिलावर्गासाठी अर्थमंत्र्यांकडून काय गुडन्यूज?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी महिलांना काही प्रमाणात दिलासा दिल्याचे पाहायला मिळाले. सीतारामन यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करताना 'लखपती दीदी' योजनेच्या विस्ताराची घोषणा केली.
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी महिलांना काही प्रमाणात दिलासा दिल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या विकासाची गेल्या दहा वर्षांतील आलेखाचा उल्लेख ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करताना ‘लखपती दीदी’ योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ‘लखपती दीदी’ योजनेचे उद्दिष्ट, जे सुरुवातीला 2 कोटी महिलांचे होते, ते 3 कोटी महिलांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी बजेट भाषणात देत पीएम आवास योजनेतंर्गत 70 टक्के घरं महिलांना देण्याचेही त्यांनी जाहीर केले.