नादखुळा ! अन् मर्सिडीज, फरारी गाड्यांपेक्षाही महागडा रेडा; किंमत ऐकून व्हाल थक्क

नादखुळा ! अन् मर्सिडीज, फरारी गाड्यांपेक्षाही महागडा रेडा; किंमत ऐकून व्हाल थक्क

| Updated on: Mar 25, 2023 | 8:42 PM

VIDEO | अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये सध्या सर्वात मोठा पशुधन एक्स्पो सुरू, त्यातच एक रेडा भाव खाऊन जातोय... त्यांची किमंत ऐकून चर्चा तर होणारचं ना...

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये देशपातळीवरील सर्वात मोठं पशुधन एक्स्पो कालपासून शिर्डीत सुरू झालं असून दररोज हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन विभागाने देशभरातील विविध आठशे जातींचे पशु पक्षी या ठिकाणी बघण्यासाठी ठेवले असून हरियाणातील मु-हा जातीचा रेडा या एक्स्पोतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसतोय.. या रेड्याच नाव इंदर असून त्याची ‌साधारण किंमत बारा कोटी रूपये आहे. या रेड्यापासून जन्मलेल्या म्हैस पंचवीस लीटर दूध देतात हे विशेष या रेड्याचं आवर्जून सांगितले जात आहे. मर्सिडीज आणि फरारी या महागाड्या गाड्यांपेक्षाही अधिक जास्त किंमतीचा हा रेडा आहे. हा रेडा पाहण्यासाठी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

Published on: Mar 25, 2023 08:42 PM