Nagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील

Nagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील

| Updated on: Jun 22, 2021 | 12:10 AM

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील वेस्टिन या पंचतारांकित हॉटेलमध्ये अविनाश भोसले यांचे काही शेअर्स होते. हे हॉटेलही ईडीकडून सील करण्यात आलं आहे. तर,  नागपुरातील ली – मेरिडियन या हॉटेल चा सुद्धा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.

Published on: Jun 22, 2021 12:10 AM