संजय गायकवाड 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टच म्हणाले, '...म्हणून पोलिसानं माझी गाडी धुतली'

संजय गायकवाड ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर स्पष्टच म्हणाले, ‘…म्हणून पोलिसानं माझी गाडी धुतली’

| Updated on: Aug 29, 2024 | 5:25 PM

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांची गाडी एक पोलीस धुवत असल्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुकवरुन पोस्ट केला आहे. पोस्ट केलेला व्हिडीओ हा बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकाताली असून तेथे संजय गायकवाड यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर स्वतः गायकवाड यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे.

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस आमदाराची गाडी धुतानाचा हा व्हिडीओ पोस्ट करताना महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या आणि आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? असा थेट सवालच केल्याचे पाहायला मिळाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलिसानं धुतली असल्याचे या व्हिडीओ कॅप्शनमध्ये आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर स्वतः संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गायकवाड म्हणाले,  ‘माझ्या संरक्षणासाठी असलेल्या युवराज मुळे या पोलिसाने हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला. यानंतर प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली. त्यामुळे गाडी संपूर्ण खराब झाली होती. तर गाडी धुण्यावरून ड्रायव्हर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला. दरम्यान, ड्रायव्हरने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटलं की, तू उलटी करून गाडी खराब केली तूच गाडी धुवून दे. म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकी म्हणून गाडी साफ केली, यात काहीही गैर नाही’, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 29, 2024 05:25 PM