शिक्षणासाठी काय पण! विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास, कुठंय धक्कादायक वास्तव?
VIDEO | सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यातील असलेल्या गावाला आमना नदीची सीमा, नदीपात्रावर पुलाची सोय नसल्यानं नागरिकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास..धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल
बुलढाणा, १६ ऑगस्ट २०२३ | बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यातील दोन जवळ जवळ असलेल्या गावाला आमना नदीची सीमा आहे. जळगाव आणि पिंपळगाव अशी संबंधित गावाची नावे असून या दोन्ही गावातील ग्रामस्थांना, रुग्णांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना रोज हे नदीपात्र पार करून आपला जीव मुठीत घेऊन इकडून तिकडे जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. नदीपात्र मोठं आणि खोल असून इथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगितले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन्ही गावचे ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करत असूनही प्रशासन मात्र त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाताना पालकांचा जीव मुठीत असतो. याशिवाय ग्रामस्थांनी प्रशासनाला एक महिन्याचा अवधी दिला असून नदीपात्रावर पुलाची व्यवस्था करा अन्यथा मुलांना शाळेत पाठवणरा नसल्याचं इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे.