वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं नागरिकांची दैना, घरावरील छप्परं उडाली अन्…
VIDEO | राज्यात अवकाळीचा कहर, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं लोकांची उडाली दाणादाण, बघा व्हिडीओ
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी संग्रामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा अवकाली पाऊस झाल आहे. या अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानामुळे अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घराची छपरे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली असून अनेकांची संसार उघड्यावर पडला आहेत. या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची मोठी दैना झाली. ज्यांच्या घरावरील छतं उडून गेली त्यांना रात्र जागून काढावी लागली. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये खामगाव, चिखली, जळगाव जामोद यासह इतर तालुक्यात ही पाऊस झला. खामगाव तालुक्यात तर पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली.
Published on: Apr 21, 2023 10:40 AM
Latest Videos