विदर्भाची पंढरी, शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी

विदर्भाची पंढरी, शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी

| Updated on: Mar 03, 2024 | 12:16 PM

बुलढाणा जिल्ह्यातील आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या आज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा असल्याने शेगांव संत नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. राज्यभरातील लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झालेत. दिवसभर भाविकांची रलेचेल याठिकाणी पाहायला मिळत आहे.

बुलढाणा, ३ मार्च २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांचा आज 146 वा प्रगटदिन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न होतोय.. माऊलींच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लाखोंच्यावर भाविक शेगावात दाखल झालेले आहेत. महाराजांच्या प्रति असलेली अपार श्रद्धा आणि भावना घेऊन भाविक शेगावात नतमस्तक होण्यासाठी येतात. हा प्रगटदिन सोहळा मागील 28 फेब्रुवारी पासून सुरु असून यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडताय. तर 700 च्यावर पालख्या सुद्धा याठिकाणी कालपर्यंत दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शेगावात भाविक-भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तर आज महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळत असून मोठे भक्तिमय वातावरण शेगावात पाहायला मिळत आहे. दहा वाजता पूर्णाहुती आणि 12 वाजता कीर्तन सोहळा असणार आहे. तर दुपारी चार वाजता नगर परिक्रमा होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.

Published on: Mar 03, 2024 12:16 PM