Nitin Gadkari | बायकोला न सांगता सासऱ्याच्या घरावर बूलडोजर - नितीन गडकरी

Nitin Gadkari | बायकोला न सांगता सासऱ्याच्या घरावर बूलडोजर – नितीन गडकरी

| Updated on: Sep 16, 2021 | 3:52 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरु झाला आहे. नितीन गडकरी यांनी हरियाणा आणि राजस्थानमधील कामाची पाहणी केली. नितीन गडकरींनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्याकामाची हवाई पाहणी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्यव्यामुळे आणि कामाच्या धडाडीमुळे ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपमध्येच नाही तर सर्वच राजकीय पक्षात गडकरींना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा नितीन गडकरी यांनी गुरुवारी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केलीय. हरियाणाच्या सोहनामध्ये एक कार्यक्रमही पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबाबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट करत आपल्या कार्यशैलीचं दर्शन घडवलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, तेव्हा माझं नवीनंच लग्न झालं होतं. माझ्या सासऱ्याचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. रामटेकमध्ये ते घर होतं. तेव्हा मी पत्नीला कुठलिही कल्पना न देता सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर घरात काय झालं हे मी सांगणार नसल्याचं गडकरी म्हणाले.

Published on: Sep 16, 2021 03:19 PM