मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली, बंदोबस्तात वाढ अन् ताफ्यात अजून काय बदल?
VIDEO | मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण आयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत शेकडो पोलीस तैनात अन् सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून मुंबई विमानतळाहून लखनौच्या दिशेला रवाना झाले. त्यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर योगी सरकारकडून विशेष तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांची गाडी बदलण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण आयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत शेकडो पोलीस असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.