Pune | बैलगाडा मालकांवरील खटले मागे घेऊ, गृहमंत्र्यांचे आश्वासन

Pune | बैलगाडा मालकांवरील खटले मागे घेऊ, गृहमंत्र्यांचे आश्वासन

| Updated on: Aug 21, 2021 | 9:47 PM

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्यानं सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यत करुन दाखवली. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांबाबत आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.

गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्यानं सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यत करुन दाखवली. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांबाबत आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले. ते आज आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नव्या सुविधांच्या लोकार्पणावेळी बोलत होते.