Sangli | सांगलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीसाठी बैलगाड्या यायला सुरुवात : गोपीचंद पडळकर

Sangli | सांगलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीसाठी बैलगाड्या यायला सुरुवात : गोपीचंद पडळकर

| Updated on: Aug 20, 2021 | 12:01 AM

पोलीस प्रशासनाला गुंगारा देत अनेक बैलगाडी चालक-मालक बैलगाड्या घेऊन सांगलीतल्या झरे गावात दाखल होऊ लागले आहेत. स्वतः गोपीचंद पडळकरांनी स्पर्धेसाठी आलेल्या बैलगाडी चालक-मालकांचं स्वागत केलं.

बैलगाडा शर्यतीवरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीतल्या झरे गावात 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर कुठल्याही स्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही, असा पवित्रा स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. झरे गाव आणि पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाला गुंगारा देत अनेक बैलगाडी चालक-मालक बैलगाड्या घेऊन सांगलीतल्या झरे गावात दाखल होऊ लागले आहेत. स्वतः गोपीचंद पडळकरांनी स्पर्धेसाठी आलेल्या बैलगाडी चालक-मालकांचं स्वागत केलं. (bullock carts start coming for the race in sangli: Gopichand Padalkar)