Railway Employee Local VIDEO : ट्रेन रिकामी, सीटवर पाय... विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी अन् उर्मटपणा, व्हिडीओ व्हायरल

Railway Employee Local VIDEO : ट्रेन रिकामी, सीटवर पाय… विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी अन् उर्मटपणा, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 16, 2025 | 1:16 PM

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याने सामान्य प्रवाशांना या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकलमध्ये चढण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तर चढलेल्या समान्य प्रवाशांना या कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करण्यात आली.

मुंबईची लाईफ-लाईन म्हणून मुंबईची लोकल ट्रेन ओळखली जाते. मात्र बऱ्याचदा रेल्वेची वाहतूक विस्कळीत असल्याच्या बातम्या समोर येताना दिसतात. सकाळीच रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला वेळेवर आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब होतो. परिणामी नोकरदार प्रवाशांना लेटमार्क लागतो. दरम्यान, आज सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू होती. मात्र यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी धावणारी विशेष लोकल एकदम वेळेवर सुरू होती. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याने सामान्य प्रवाशांना या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकलमध्ये चढण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांनी नकार दिला. इतकंच नाहीतर यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून समान्य प्रवाशांवर दादागिरी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘आरपीएफला बोलवू.. साखळी खेचून खाली उतरवू’, अशा धमक्या सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवाशांकडून देण्यात आल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या दादागिरी आणि उर्मटपणा करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बघा व्हिडीओ…

Published on: Jan 16, 2025 01:16 PM