Nana Patole | पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा : नाना पटोले

Nana Patole | पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा : नाना पटोले

| Updated on: Nov 18, 2021 | 5:34 PM

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.

सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते डावपेच आखण्यात दंग आहेत. कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आलीय. हीच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यापूर्वीदेखील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याच नाना पटोले म्हणाले होते. त्या नंतर आता नाना पटेले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Published on: Nov 18, 2021 05:20 PM