VIDEO : Sandeep Deshpande LIVE | राष्ट्रवादीने जे केलं तेच राज ठाकरे बोलले, संदीप देशपांडे यांची सडकून टीका
संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. याचं समर्थन करताना देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं.
Latest Videos